कारची दुचाकीला धडक, दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:32 IST2021-02-18T04:32:06+5:302021-02-18T04:32:06+5:30
श्याम पारडे (२८) व दिलीप श्रीधर सोळंके (५५) दोघेही राहणार बाभळी दर्यापूर एमएच २७ एपी ७९२६ क्रमांकाच्या दुचाकीने ...

कारची दुचाकीला धडक, दोघे गंभीर जखमी
श्याम पारडे (२८) व दिलीप श्रीधर सोळंके (५५) दोघेही राहणार बाभळी दर्यापूर एमएच २७ एपी ७९२६ क्रमांकाच्या दुचाकीने मूर्तिजापूरकडे येत असताना, समोरून येणाऱ्या भरधाव अज्ञात कारने दुचाकीला धडक दिली. यात श्याम दादाराव पारडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांचा एक पाय निकामी झाला. दिलीप सोळंके हे सुद्धा जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. श्याम पारडे यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
फोटो: