कारने दुचाकीस्वारास चिरडले; युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST2021-08-24T04:23:52+5:302021-08-24T04:23:52+5:30

अंदुरा: अंदुरा-कारंजा रम रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीस्वारास चिरडल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.२३ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या ...

The car crushed the two-wheeler; Young man killed | कारने दुचाकीस्वारास चिरडले; युवक ठार

कारने दुचाकीस्वारास चिरडले; युवक ठार

अंदुरा: अंदुरा-कारंजा रम रस्त्यावर भरधाव कारने दुचाकीस्वारास चिरडल्याने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना दि.२३ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. हरीश लक्ष्मण नांगोलकार (३४,रा. अंदुरा) असे मृतक युवकाचे नाव आहे.

अंदुरा येथील रहिवासी हरीश नांगोलकार हा दुचाकी क्रमांक (एमएच ३०, झेड ७१५४) ने अंदुरा-कारंजा रम रस्त्याने शेतात जात असताना समोरून विरुद्ध दिशेने शेगावहून अकोटकडे जात असलेल्या भरधाव कार क्रमांक (एमएच २७ डीए १०११) ने हरीश लक्ष्मण नांगोलकार (३४) याच्या दुचाकीस जबर धडक दिली. या अपघातात हरीश नांगोलकार यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंत वडतकार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठविला. अपघातानंतर वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. हरीश नांगोलकार यांच्यामागे वयोवृद्ध आई, पत्नी आणि दोन मुले आहेत.

------------------------

Web Title: The car crushed the two-wheeler; Young man killed