चिखलदर्‍याच्या ४00 फूट खोल दरीत कार कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 02:31 IST2017-10-02T02:30:52+5:302017-10-02T02:31:26+5:30

अकोला : अमरावतीहून चिखलदराकडे जाणारी कार घाट वळणावरील ओशो पॉइंटनजीक ४00 फूट खोल दरीत कोसळून, एक जण अत्यवस्थ, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८.३0 वाजता घडली.

The car collapsed in 400 feet deep in the maze | चिखलदर्‍याच्या ४00 फूट खोल दरीत कार कोसळली

चिखलदर्‍याच्या ४00 फूट खोल दरीत कार कोसळली

ठळक मुद्देएक अत्यवस्थ, चौघे गंभीरघाट वळणावरील ओशो पॉइंटनजीक खोल दरीत कोसळली

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अमरावतीहून चिखलदराकडे जाणारी कार घाट वळणावरील ओशो पॉइंटनजीक ४00 फूट खोल दरीत कोसळून, एक जण अत्यवस्थ, तर चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री ८.३0 वाजता घडली.
चंद्रकुमार एस. दंदे (४0)  रा. समतानगर  वाशिम, कमलेश शिम्पे (४१) रा. देशमुख प्लाट परतवाडा, राजेश रामदास पोहरे (४२) रा म्हाडा कॉलनी अकोला, अविनाश तायडे (४0) रा. अकोट फैल अकोला, विमलेश पांडे उमरी लहान अकोला अशी गंभीर जखमींची नावे आहेत. वेगात असलेली कार वळणावर अनियांत्रित झाल्याने थेट दरीत कोसळली. 
याबाबतचे वृत्त लिहिस्तोवर चिखलदरा पोलीस घटनास्थळी पोहचले होते. दरम्यान अग्निशमन दलाच्या सहाय्याने कारचा आणि बेपत्ता एका सहकार्‍याचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. 
-

Web Title: The car collapsed in 400 feet deep in the maze