Car bike accident; youth killed in Akola | कारची दुचाकीला धडक; युवक ठार
कारची दुचाकीला धडक; युवक ठार


लोकमत न्यूज नेटवर्क
व्याळा: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील अंबुजा सोयाबीन फॅक्टरीजवळ भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
या अपघातात विवेक वसंतराव खेळकर (३५) याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सहकारी मयूर अनिल पाठक गंभीर जखमी झाला. या प्रकरणात बाळापूर पोलिसांनी तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर एमएच ३0-एपी-११५ क्रमांकाच्या भरधाव कारने एमएच ३0-वाय-४४५0 क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही कार सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकाची असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून जखमीला रुग्णालयात भरती केले. पोलीस पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Car bike accident; youth killed in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.