‘जात फॅक्टर’ रॅम्पवर उमेदवारांचा ‘शो’ !

By Admin | Updated: September 29, 2014 01:50 IST2014-09-29T01:50:28+5:302014-09-29T01:50:28+5:30

आकोट विधानसभा मतदारसंघात जाती-धर्मावर आधारित उमेदवार निवडणूक रिंगणात .

Candidates 'show' on 'Jai Factor' ramp! | ‘जात फॅक्टर’ रॅम्पवर उमेदवारांचा ‘शो’ !

‘जात फॅक्टर’ रॅम्पवर उमेदवारांचा ‘शो’ !

विजय शिंदे / आकोट
आकोट विधानसभा मतदारसंघात प्रत्येक राजकीय पक्षाने जाती-धर्मावर आधारित उमेदवार निवडणूक मैदानात उतरविले आहेत. प्रत्येकांजवळ समाजाचे गठ्ठा मतदान असल्याचा समज असला तरी मतांचे विभाजन रोखून मुंबई गाठण्यासाठी ह्यजात फॅक्टरह्ण रॅम्पवर उमेदवारांचा ह्यशोह्ण सुरू आहे. शिवाय मुस्लीम व दलित तसेच बारी समाजाची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळेस प्रत्येक पक्ष स्वंतत्रपणे लढत असल्याने शिवसेनेतर्फे संजय गावंडे यांची उमेदवारी पुन्हा कायम आहे, तर गतवर्षी अपक्ष लढणारे प्रकाश भारसाकळे यांना भाजपने आकोटमध्ये उतरविले आहे. शिवाय राकाँतर्फे राजू बोचे व मनसेच्यावतीने प्रदीप गावंडेसुद्धा मैदानात आहेत. कुणबी समाजाच्या गठ्ठा मतावर भारिप-बमसंने नजर ठेवून प्रदीप वानखडे यांना उमेदवारी बहाल केली आहे. तसेच दलित गठ्ठा मते लक्षात घेता भारिप-बमसं पक्षाच्या अनेक इच्छुकांनी उमेदवारी दाखल केली आहेच. या सर्वांच्या उमेदवारीने मराठा- कुणबी समाजाच्या मतांचे विभाजन होणार आहे. शिवाय शिवसेना व भाजपा स्वतंत्रपणे लढत असल्याने पक्षाच्या मताचे विभाजनाचा फटका यावर्षी फुटलेल्या- तुटलेल्या युती व आघाडीच्या पक्षांना बसणारच आहे. पूर्वी या मतदारसंघावर जनसंघ व भाजपाचा प्रभाव होता. युती झाल्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्यानंतर एक अ पवाद वगळता शिवसेना आतापर्यंत कायम आहे. गणगणे यांच्याकडे माळी समाजाची एक गठ्ठा मते आहेत. दुसरीकडे यावर्षी मुस्लिम समाजातील अनेकांनी उमेदवारी दाखल केली आहे. कॉंग्रेसकरिता माजी राज्यमंत्री रामदास बोडखे यांच्या इच्छाशक्तीचा प्रभाव महत्त्वाचा राहणार आहे. मो. बद्रुजम्मा हे मुस्लिमांची मते काँग्रेसच्या खात्यात जमा करण्यात किती यशस्वी होतात, हे सुद्धा महत्त्वाचे राहणार आहे. दुसरीकडे आकोट मतदारसंघात हिंदी भाषिक व अल्पसंख्याक समाजाची मते कोण्याच्या पारड्यात पडतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Candidates 'show' on 'Jai Factor' ramp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.