केक मेकिंग अँन्ड आईसिंग वर्कशॉप

By Admin | Updated: July 13, 2014 00:59 IST2014-07-13T00:59:00+5:302014-07-13T00:59:00+5:30

लोकमत सखी मंचतर्फे आयोजन

Cake Making And Ice Workshop | केक मेकिंग अँन्ड आईसिंग वर्कशॉप

केक मेकिंग अँन्ड आईसिंग वर्कशॉप

अकोला : कुणाचा वाढदिवस असो, लग्न समारंभ असो, सणवार असो किंवा कुठला आनंदाचा क्षण साजरा करायचा असेल तर आनंद व्यक्त करायला केकपेक्षा चांगला पर्याय नाही; पण केक जर विकत आणायचा म्हटले तर सर्वप्रथम आपला खिसाच बघावा लागतो. मग विचार येतो जर हा केक घरीच बनविता आला तर किती छान झाले असते आणि स्वत: बनविलेला केकचा आनंद पण वेगळाच असणार.बर्‍याच महिलांना केक तर बनविता येतो पण बर्‍याच वेळा तो फुगत नाही किंवा त्यात क्रेल्स पडतात, केक बनविण्याचा अंदाज किती असतो, केक बनला पण त्याची सजावट आईसिंग कशी करतात, वेगवेगळ्य़ा कार्यक्रमानुसार त्याला कसे घरीच तयार करता येईल, असे प्रश्न नेहमी भेडसावत असतात. असेच प्रश्नाचे उत्तर कार्यशाळेची संकल्पनेतून लोकमत सखी मंच घेऊन येत आहे. केक मेकिंग अँड आईसिंग कार्यशाळा ही कार्यशाळा शनिवार, १९ जुलै रोजी दुपारी २ वाजता हॉटेल सेंटर प्लाझा येथे घेण्यात येणार आहे. ज्यात शेफ गजानन तायडे सोबत राजश्री लढ्ढा व सीमा सारडा तीन प्रकारचे केक व सात प्रकारची आईसिंग वेगवेगळे कार्यक्रमानुसार बनविणे शिकवणार आहेत.या कार्यशाळेकरिता नोंदणी शुल्क सखी मंच सभासदांकरिता ५0 रु. व इतरांकरिता १00/— रु. असून नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणी लोकमत शहर कार्यालय येथे सकाळी १0 ते ६ या वेळेत सुरू आहे. प्रथम नावनोंदणी करण्यास प्राधान्य देण्यात येईल. या कार्यक्रमाकरिता सखी मंच संयोजिका मीनाक्षी फिरके यांच्याशी ९८५0३८२१४0 क्रमांकावर संपर्क साधावा.

Web Title: Cake Making And Ice Workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.