खरेदीदार थेट शेतात!
By Admin | Updated: October 18, 2014 23:29 IST2014-10-18T23:29:44+5:302014-10-18T23:29:44+5:30
बटाट्याची करार शेती: अकोल्यात पहिले खरेदीदार-विक्रेते संमेलन.

खरेदीदार थेट शेतात!
अकोला: वर्हाडातील शेतकरी करार शेतीच्या माध्यमातून बाजारभिमूख व्यवस्थापनाच्या दिशेने वाटचाल करीत असून, करार शेती अंतर्गत उत्पादित बटाट्याला वाजवी दर मिळावे, यासाठी महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास (एमएसीपी) प्रकल्पांतर्गत केल्या जात असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, शनिवारी अकोला येथे खरेदीदार व विक्रे त्यांचे पहिले संमेलन पार पडले.
उत्पादित कृषी मालाची विक्री कार्यक्षम होण्याकरिता खरेदीदार-विक्रेता संमेलनाद्वारे समन्वय साधण्याचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे विक्री व्यवस्था क्लिष्ट होत असून, ग्राहकांची मागणी दिवसेंदिवस बदलत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यासोबत संयुक्त उपक्रम राबवून नवीन जाळे विणण्याचा ह्यएमएसीपीह्णचा प्रयत्न आहे. खरेदीदार-विक्रेता संमेलनाच्या माध्यमातून व्यापाराच्या नवीन संधी उपलब्ध करण्यावर खर्या अर्थाने भर देण्यात आला. या प्रकल्पांतर्गत वर्हाडात शंभर पेक्षा जास्त उत्पादक कंपन्याची स्थापना झाली असून, एकट्या अकोला जिल्हय़ातच १४ उत् पादक कंपन्या स्थापण्यात येत आहेत. खासगी उद्योजक कंपन्याबरोबर पूर्व हमीभाव किंवा उत्पादन आधारीत भाव देऊन, करार पध्दतीने कृषी माल खरेदी करण्यासाठी शेतकरी उत् पादक कंपन्यांची या माध्यमातून सांगड घालण्यात येत आहे.
अकोला व बुलडाणा जिल्हय़ात बटाट्याची करार शेती केली जात असून, अकोला जिल्हय़ा त यंदा प्रथमच रब्बी हंगामात ४0 हेक्टरच्यावर बटाटा लागवड करण्यात येणार आहे. प्रामुख्याने पातूर व बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकर्यांनी बटाटा पिक लागवडीवर भर दिला आहे. याकरिता या शेतकर्यांनी एका खासगी कंपनीशी करार केला आहे.