शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हमीदरापेक्षा कमी भावानेच मुगाची खरेदी

By admin | Updated: September 3, 2016 02:27 IST

पणन संचालकांचे आदेश धाब्यावर; गरजेपोटी शेतक-यांकडून विक्री.

खामगाव (जि. बुलडाणा) : मुगाची १ सप्टेंबरपासून ५२२५ रुपये प्रतिक्विंटल या हमीदराने खरेदी करण्याचे आदेश राज्याच्या पणन संचालकांनी दिले आहेत; मात्र असे आदेश असतानासुद्धा जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये व्यापार्‍यांकडून हमीदरापेक्षा कमी भावात मुगाची खरेदी केल्या जात असून, शेतकर्‍यांची अडवणूक केल्या जात असल्याचा प्रकार दिसून येत आहे.एकीकडे सर्वच वस्तुंची भाववाढ होताना शेतमाल उत्पादनांसाठी आवश्यक कृषी निविष्ठांचे दर वाढले आहेत. यामुळे एकरी उत्पादन खर्चात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. यासोबतच दरवर्षी अस्मानी संकटासोबत सुलतानी संकटसुद्धा पिकावर असते. यामुळे शेतमालास उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा, अशी ओरड शेतकर्‍यांकडून केल्या जाते. त्यामुळे शासनाने शेतमालास हमीदर जाहीर केले आहेत. या हमीदरानुसार ४८00 रुपये व बोनस ४२५ रुपये असे ५२२५ रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे मुगाची खरेदी व्हायला हवी; मात्र १६ ऑगस्टपासून नवीन मुगाची बाजारात आवक झाल्यावर हमीदर ४८00 रुपये यापेक्षा कमी भावाने मुगाची खरेदी करण्यात आली. याची दखल घेत राज्याचे सहकार, पणन मंत्री ना.सुभाष देशमुख यांनी १ सप्टेंबरपासून हमीदरानेच मुगाची खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत; मात्र असे असताना सुद्धा बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा, चिखली,खामगाव, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ सप्टेंबरनंतरही हमीदर मुगाला मिळत नाही. त्यामुळे पणन विभागाचे आदेश धाब्यावर बसविल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)२ सप्टेंबर रोजी कृउबासमध्ये मुगाचे विक्रीदरजळगाव जामोद :          ४२00 - ४५00शेगाव :                       ४३00 - ४८५0संग्रामपूर :                   ४२00मलकापूर :                  ४५00 - ४८८0नांदुरा :                       ४३९0 - ४८५0खामगाव :                   ४७00 - ५३00चिखली :                    ३६२0 - ४३७१देऊळगाव राजा :          ४४00 - ४५५१