बुरखाधारी कापडचोर महिला कारागृहात
By Admin | Updated: March 14, 2016 01:14 IST2016-03-14T01:14:46+5:302016-03-14T01:14:46+5:30
अकोला शहरात होती कापडचोर टोळी सक्रिय; आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी.

बुरखाधारी कापडचोर महिला कारागृहात
अकोला: शहरातील महागड्या कापड दुकानांमध्ये क ापड खरेदी-विक्रीच्या बहाण्याने जाऊन बुरख्यामध्ये कापड चोरी करणार्या तीन बुरखाधारी महिला व त्यांच्या ऑटोचालक साथीदारास शनिवारी अटक करण्यात आली. या चारही चोरट्यांना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.
पोळा चौकातील रहिवासी फातमा बी सै. नजीर (५५), रशीद बी. शेख दिवान (४२) व शबनम बी. मोहम्मद रफीक या तीन महिला शुक्रवारी सायंकाळी संघवीवाडीसमोर असलेल्या आशीर्वाद साडीज या शोरूममध्ये साडी खरेदीच्या बहाण्याने गेला व त्यांनी दोन साड्या चोरून शोरूममधून पळ काढला. हा प्रकार मालक राजू दयाचंद अग्रवाल व दुकानातील सेल्स गर्ल यांना कळल्याने त्यांनी शोरूममधील सीसी फुटेज तपासले असता, महिलांनी बुरख्यामध्ये साड्या चोरल्याचे स्पष्ट झाले; मात्र चेहरा पूर्ण झाकलेला असल्याने त्या नेमक्या कोण आहेत, हे त्यांना दिसले नाही; मात्र त्या तीनही चोर अ. आरीफ अ. रफीक याच्या एम एच ३0 पी ९२५९ क्रमांकाच्या ऑटोमध्ये बसताना दिसल्या. यावरून त्यांनी ऑटो क्रमांकासह सीसी फुटेज सीटी कोतवाली पोलिसांना दिले. पोलिसांनी चारही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. रविवारी तीनही महिलांसह ऑटोचालकास न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.