सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांच्यासह पत्नीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 13:07 IST
सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांच्यासह पत्नीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांच्यासह पत्नीचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
अकोला : खदान पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आझाद कॉलनीच्या बाजूला असलेल्या बळवंत कॉलनी येथे भगत दांपत्याचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले .ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ही माहिती पोलिसांना मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. घटना कशामुळे घडली आणि यामागे काय कारण आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत.अकोला शहरातील बळवंत कॉलनी परिसरात आज पहाटेच्या सुमारास वृद्ध दाम्पत्याचे मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतक नथुजी भगत हे सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी असून त्यांची पत्नी हेमलता भगत घरकाम करींत होत्या. या दोघांच्या मृत्युचे कारण नेमकं कळू शकले नाही. अधिक तपास खदान पोलिस करीत आहेत.बंगल्यात नव्हते दुसरे कोणीचपोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेह आढळलेल्या सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भगत यांच्या बंगल्यात त्यांच्या पत्नीसह दुसरे कोणीही कुटुंबीय राहत नव्हते . घरात आग लागून जीव गुदल्यामुळे मृत्यू झाला झाला की ही आत्महत्या आहे हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.