पुतळा दहन करण्यापूर्वीच ‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते ताब्यात!

By Admin | Updated: June 3, 2017 01:35 IST2017-06-03T01:35:46+5:302017-06-03T01:35:46+5:30

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया: शिक्षण संचालकांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न

Before the burning of the statue, the NSUI activists are in possession! | पुतळा दहन करण्यापूर्वीच ‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते ताब्यात!

पुतळा दहन करण्यापूर्वीच ‘एनएसयूआय’चे कार्यकर्ते ताब्यात!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने करण्यासाठी परवानगी न देणाऱ्या शिक्षण संचालकांचा प्रतीकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘एनएसयूआय’च्या कार्यकर्त्यांना रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सायंकाळी सोडून देण्यात आले.
शहरातील ५३ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने राबविण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने पुढाकार घेतला. त्यासाठी शिक्षण विभागाने पुणे येथील शिक्षण संचालकांकडे परवानगी मागितली; परंतु शिक्षण संचालकांनी अद्यापपर्यंत परवानगी दिली नाही.
दहावी परीक्षेचा निकाल तोंडावर असताना, केंद्रीय प्रवेशासाठी परवानगी देणे गरजेचे होते. शिक्षण संचालकांनी परवानगी न दिल्यामुळे काँग्रेसप्रणीत एनएसयूआयने शुक्रवारी दुपारी शिक्षण संचालकांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याची तयारी चालविली होती. पुतळा दहन करण्यापूर्वीच रामदासपेठ पोलिसांनी एनएसयूआयचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात एनएसयूआयचे महासचिव अंकुश तायडे, अक्षय गडेकर, सारंग शिंदे, कुणाल झांबरे, वैभव सुळकर, शुभम तिडके, जय गिऱ्हे, सम्राट ठाकरे, चेतन भिलकर, ऋषिकेश सनगाळे, प्रणव जोशी, रोहित थामेद, अक्षय भटकर, अक्षय लोणकर, गौरव मांजरे आदींचा सहभाग होता.

Web Title: Before the burning of the statue, the NSUI activists are in possession!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.