पत्नीला जिवंत जाळले!
By Admin | Updated: March 28, 2016 01:45 IST2016-03-28T01:45:28+5:302016-03-28T01:45:28+5:30
आकोट येथील घटना; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल.

पत्नीला जिवंत जाळले!
आकोट (जि. अकोला): घरगुती कारणाने भांडण करून पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याची घटना २६ मार्च रोजी स्थानिक चिरफाड बंगल्याजवळ घडली. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून, पतीविरुद्ध आकोट शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अंजनगाव मार्गावरील चिरफाड बंगल्याजवळ रेखाते कुटुंब राहते. या कुटुंबात पती देवीदास महादेव रेखाते हा पत्नी इंदू रेखाते (३५) हिच्यासोबत घरगुती कारणावरून नेहमीच कटकट करायचा. घटनेच्या दिवशीसुद्धा इंदूसोबत भांडण करून तिला जीवे मारण्याच्या उद्देशाने अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले. जखमी अवस्थेत उपचाराकरिता दाखल केले असता तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी इंदू रेखाते हिची मृत्यूपूर्व जबानी नोंदविण्यात आली. त्यावरून इंदू रेखातेतर्फे फिर्यादी होमगार्ड प्रवीण नाथे याने मृत्यूपूर्व जबानीचा आशय घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून व र्मग खबरीवरून आरोपी पती देवीदास महादेव रेखाते याच्या विरुद्ध भादंवि ३0७, ३0२ कलमान्वये आकोट शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अण्णाराव खोडेवाड करीत आहेत.