अवघ्या ४८ तासांत लावला घरफोडीचा छडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 20:22 IST2017-10-04T20:21:26+5:302017-10-04T20:22:50+5:30
अकोट : अकोट शहरातील राजदे प्लॉट येथील राहणार राजेंद्रप्रसाद जगदीशप्रसाद तरडेजा यांच्या घरी ३0 सप्टेंबर रोजी रात्रीला घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातील आलमारीमधील ३२ हजार रुपये नगदी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

अवघ्या ४८ तासांत लावला घरफोडीचा छडा!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट शहरातील राजदे प्लॉट येथील राहणार राजेंद्रप्रसाद जगदीशप्रसाद तरडेजा यांच्या घरी ३0 सप्टेंबर रोजी रात्रीला घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरातील आलमारीमधील ३२ हजार रुपये नगदी अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. याप्रकरणी अकोट शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी यांना गुन्हा उघडकीस आणण्याकरिता केलेल्या मार्गदर्शनानुसार डीबी पथकचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड, पोहेकाँ संजय घायल, गोपाल अघडते, राकेश राठी, गुड्डू पठाण, विजय सोळंके यांनी घटनास्थळाच्या शेजारी राहणार्या लोकांना विचारपूस केली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाच-सहा संशयित लोकांवर पाळत ठेवण्यात आली. यानंतर गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या एका विधी संघर्ष बालकाने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्ह्यातील चोरी गेलेली ३२ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.