अकोट शहरात घरफोडी
By Admin | Updated: July 17, 2017 03:01 IST2017-07-17T03:01:53+5:302017-07-17T03:01:53+5:30
अकोट : स्थानिक खानापूर वेस परिसरातील बंद असलेले घर अज्ञात चोरट्याने फोडले. घरातील एक लाख रुपयांच्यावर असलेला मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १६ जुलै रोजी उघडकीस आली.

अकोट शहरात घरफोडी
अकोट : स्थानिक खानापूर वेस परिसरातील बंद असलेले घर अज्ञात चोरट्याने फोडले. घरातील एक लाख रुपयांच्यावर असलेला मुद्देमाल चोरून नेल्याची घटना १६ जुलै रोजी उघडकीस आली.
खानापूर परिसरातील फिर्यादी प्रमिला विजय तायडे या आठ दिवसांपूर्वी मुलीकडे नागपूरला गेल्या होत्या. त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाट फोडून ७२ हजार रुपये किमतीचे सोने व ६५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १ लाख ३७ हजारांचा ऐवज चोरून नेला. १६ जुलै रोजी त्या गावावरून आल्या असता सदर प्रकार उघडकीस आल्याने तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञात आरोपीविरुद्ध ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे आदींनी भेट दिली.