दुकान फोडणारा चोरटा गजाआड

By Admin | Updated: December 5, 2014 00:45 IST2014-12-05T00:45:59+5:302014-12-05T00:45:59+5:30

३८ हजारांचा माल जप्त.

Burglar burglar | दुकान फोडणारा चोरटा गजाआड

दुकान फोडणारा चोरटा गजाआड

अकोला : जनता भाजी बाजारातील ड्रायफ्रूट्सचे दुकान फोडून ९७ हजार २८0 रुपये किमतीचे काजू, बदाम, अंजीर, पानमसाला, बिडी, सिगारेटची पाकिटे लंपास केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी चोरट्यास अटक केली. पोलिसांनी चोरट्याकडून ३८ हजार ८00 रुपयांचा माल जप्त केला.
सिंधी कॅम्पमध्ये राहणारे रमेश कन्हैयालाल गुरुनाई(३८) यांचे जनता भाजी बाजारामधील ड्रायफ्रूट्सचे १४ नोव्हेंबर रोजी अज्ञात चोरट्यांनी दुसर्‍यांदा दुकान फोडले आणि ड्रायफ्रूटसह बिडी, सिगारेटची पाकिटे, पानमसालाची पाकिटे, टीव्ही असा एकूण ९७ हजार २८0 रुपयांचा माल लंपास केला. याप्रकरणी गुरुनाई यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर फड, हेडकॉन्स्टेबल मनोहर मोहोड, पोलीस नाईक अजय नागरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, त्यांनी नवीन बैदपुरा परिसरातून नाजीम खान अक्रम खान (१९) याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुरुनाई यांचे दुकान फोडल्याची माहिती दिली. नाजीम खान याच्याकडून आणखी सहकार्‍यांची नावे आणि चोरीची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Burglar burglar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.