अडगाव येथे घरफोडी
By Admin | Updated: July 9, 2016 00:57 IST2016-07-09T00:57:37+5:302016-07-09T00:57:37+5:30
एक लाखाचा ऐवज लंपास; महिलेने केला चोरट्यांचा प्रतिकार.

अडगाव येथे घरफोडी
हिवरखेड (जि. अकोला) : पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या अडगाव येथे चार घरे फोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना ७ जुलैच्या रात्रीदरम्यान घडली.
अडगाव येथे ७ जुलैच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी देवेंद्र दत्तात्रय बोरकुटे, सिद्धेश्वर द. बोरकुटे, किस्मतउल्लाखाँ जबीरउल्लाखाँ, अफसरअली या चार ग्रामस्थांच्या घरांचा कडीकोंडा काढून सोन्या-चांदीचे दागिने, मंगळसूत्र, सोन्याची पोथ, अंगठी व रोख रक्कम, असा एकूण ९९ हजारांचा ऐवज चोरून नेला. देवेंद्र दत्तात्रय बोरकुटे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि ४५७, ३८0 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार प्रेमानंद कात्रे, हवालदार महादेव शेंडे, सुनील धार्मिक करीत आहेत.
महिलेने केला चोरट्यांचा प्रतिकार
चोरटे चोरी करून जात असताना पद्माताई सिद्धेश्वर बोरकुटे या महिलेने एका चोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने सदर महिलेला जोराने ढकलून दिले व पळून गेला.