बुलडाण्यात भीषण आग,६८ लाखाचे नुकसान
By Admin | Updated: February 12, 2015 00:07 IST2015-02-12T00:07:46+5:302015-02-12T00:07:46+5:30
वीज पडून शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत आठ दुकाने भस्मसात.

बुलडाण्यात भीषण आग,६८ लाखाचे नुकसान
बुलडाणा : वीज पडून शॉर्टसर्किट झाल्याने लागलेल्या भीषण आगीत आठ दुकाने भस्मसात झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३0 वाजता सुमारास घडली. या घटनेत जवळपास ६८ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
गेल्या काही वर्षापासून जयस्तंभ चौकातील जिल्हा परिषदेच्या पाठीमागील अतिक्रमीत जागेवर अनेक व्यावसायीकांनी दुकाने थाटली आहेत. मंगळवारी रात्री १0 ते ११ वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावी. यावेळी एका दुकानावर वीज पडताच शॉर्टसर्किट होवून त्या दुकानाला आग लागली. हवेचा जोर अधिक असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. एका पाठोपाठ आठही दुकाने यामध्ये भस्मसात झाली. बहुतांश दुकाने ही कागद, रजिष्टर, रबरी स्टॅम्प, कपडे शिलाई व इलेक्ट्रीकची होती. घटनेची माहिती मिळताच दोन अग्नीशमनच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व काही वेळात आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत दुकानदारांचे ६८ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.