३३वी राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेत बुलडाणा, अकोला व वाशिमचा दबदबा
By Admin | Updated: December 24, 2014 00:00 IST2014-12-24T00:00:40+5:302014-12-24T00:00:40+5:30
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे ३३ व्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा.
३३वी राज्यस्तरीय शुटींगबॉल स्पर्धेत बुलडाणा, अकोला व वाशिमचा दबदबा
अकोला: वर्धा जिलतील हिंगणघाट येथे २0 व २१ डिसेंबर याकालावधीत झालेल्या ३३ व्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेत बुलडाणा, अकोला, वाशिम व यवतमाळ जिलतील खेळाडूंचा दबदबा राहिला. वरिष्ठ गटात बुलडाणा संघाने प्रथम स्थान मिळविले. याच गटात अकोला महानगर संघाने द्वितीय स्थान पटकाविले. तर वाशिम संघाने तिसरेस्थान प्राप्त केले.
महिला गटात यवतमाळ संघाने विजेतेपद मिळविले. बुलडाणा संघ उपविजेता राहिला. वर्धा संघाला तृतीयस्थानावर समाधान मानावे लागले. ज्युनिअर व खुल्यागटात पुरूष विभागात बुलडाणा संघ विजेता राहिला. वाशिम उपविजेता आणि अकोला जिल्हा संघ तिसर्या स्थानावर राहिला. महिला विभागात बुलडाणा अव्वल तर वर्धा व यवतमाळ संघ द्वितीय व तृतीयस्थानावर राहिला. सब-ज्युनिअर मुलांच्या गटात बुलडाणा संघ प्रथम, वाशिम दुसरा आणि यवतमाळ संघ तिसर्या स्थानावर राहिला. मुलींच्या गटात यवतमाळ प्रथम, बुलडाणा द्वितीय आणि वर्धा तृतीय स्थानावर राहिला. या स्पर्धेत पंच म्हणून अकोल्याचे विनय लाड, गोपाल जाधव, मधुकर वडी यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण कार्यक्रमाला अकोला जिल्हा असोसिएशनचे सचिव संजयसिंह राजपुत, बुलडाणा जिल्हा असोसिएशनचे सचिव संजय वडदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.