बुलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून एक ठार

By Admin | Updated: March 11, 2015 01:36 IST2015-03-11T01:36:50+5:302015-03-11T01:36:50+5:30

वीज कोसळून १ जण ठार झाल्याची घटना खामगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.

Buldana district collapsed in lightning, killing one | बुलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून एक ठार

बुलडाणा जिल्ह्यात वीज कोसळून एक ठार

बुलडाणा: वीज कोसळून १ जण ठार झाल्याची घटना खामगाव तालुक्यात मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
मंगळवारी सायंकाळी खामगाव तालुक्यात अचानक अवकाळी पावसाला सुरूवात झाली. यावेळी वीज कोसळून तालुक्यातील घाणेगाव येथील सखाराम तुकाराम जुमळे (६५) या इसमाचा मृत्यू झाला. सखाराम जुमळे हे शेतमजूर असून ते एका शेतात कांद्याला पाणी देण्यासाठी गेले होते. सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल होवून, वादळी वारा व पाऊस सुरु झाला. त्यामुळे ते घराकडे परतत असताना त्याच्या अंगावर वीज पडली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Web Title: Buldana district collapsed in lightning, killing one