शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

बांधकाम साहित्य उठले जीवावर; अकोलेकरांना वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 18:50 IST

सर्वसामान्यांच्या जीवाला सुरक्षित करण्यासाठी प्रशासन पुढाकार का घेत नाही,असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

अकोला: इमारतींचे बांधकाम करताना थेट रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या मालमत्ताधारकांना महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटविण्याचा गर्भीत इशारा दिला होता. हा इशारा उलटून गेला असला तरी मनपाच्या स्तरावर आजपर्यंत ना बांधकाम साहित्य जप्त करण्यात आले ना मालमत्ताधारकांना दंड बजावण्यात आला. दंडात्मक रकमेच्या माध्यमातून मनपाच्या तिजोरीत आर्थिक भर घालण्यासोबतच सर्वसामान्यांच्या जीवाला सुरक्षित करण्यासाठी प्रशासन पुढाकार का घेत नाही,असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.शहराच्या कानाकोपºयात विविध इमारतींचे बांधकाम जोरात सुरू आहे. बांधकाम करताना संबंधित मालमत्ताधारकांकडून विटा, रेती, गिट्टी, लोखंड तसेच इतर साहित्य ठेवण्यासाठी थेट रस्ते किंवा सार्वजनिक जागेचा वापर केला जात आहे. नगररचना विभागाच्या नियमानुसार बांधकाम साहित्य उघड्यावर ठेवता येत नाही. मालमत्ताधारकाने खासगी मालमत्तेवर आवारभिंत उभारून त्यामध्ये साहित्य ठेवणे अपेक्षित आहे. महापालिकेच्या नियमांची ऐशीतैशी करीत बांधकाम करणाऱ्यांनी चक्क रस्त्यांचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे संबंधित परिसरातून वाहतूक करणाºया वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या रेती, गिट्टीमुळे वाहने घसरण्याचे प्रकार घडत आहेत. संबंधित मालमत्ताधारकाला हटकल्यास किंवा सूचना केल्यास त्यांच्याकडून अरेरावीची भाषा केली जाते. याप्रकरणी महापालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे पाहून रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. हा प्रकार लक्षात घेता मनपाने रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणाºया मालमत्ताधारकांना दंड बजावण्याचा निर्णय घेतला होता. आजपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही, हे विशेष.महसुलात वाढ का नाही?अकोलेकरांनी मालमत्ता कराची थकबाकी जमा करण्यास हात आखडता घेतल्याची परिस्थिती असून, यामुळे मनपा कर्मचाºयांच्या थक ीत वेतनाची समस्या पुन्हा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी रस्त्यांवर बांधकाम साहित्य ठेवणाºया मालमत्ताधारक, बांधकाम व्यावसायीकांकडून मनपा दंडात्मक रक्कम का वसूल करीत नाही,असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका