बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइलचे लोकेशन गोव्यात!

By Admin | Updated: June 30, 2017 01:01 IST2017-06-30T00:59:50+5:302017-06-30T01:01:07+5:30

अमित वाघ बेपत्ता प्रकरण: पोलिसांचा शोध सुरूच

Builder's mobile location is in Goa! | बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइलचे लोकेशन गोव्यात!

बांधकाम व्यावसायिकाच्या मोबाइलचे लोकेशन गोव्यात!

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : खडकीत राहणारे बांधकाम व्यावसायिक अमित वाघ हे पत्नी प्रियंका व दोन मुले स्पंदन व शाश्वत बेपत्ता झाली आहेत. खदान पोलिसांसह सातारा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सातारा पोलिसांनी अमितच्या मोबाइलचे लोकेशन घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याच्या मोबाइलचे लोकेशन गोवा असल्याचे दिसत होते. त्यामुळे अमितचे नातेवाईक, पोलीस त्याच्या शोधार्थ गोव्याला रवाना झाले आहेत.
अमित वाघ हा ३ जून रोजी पत्नी, मुलांसह स्वत:च्या कारसह अहमदनगरला गेला. या ठिकाणी त्याने चालकाला अकोल्यात परत पाठवून दिले. त्यानंतर त्याने पुणे, सातारा येथे जात असल्याचे सांगितले. ३ ते १३ जूनपर्यंत अमित त्याच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांच्या संपर्कात होता; परंतु त्यानंतर त्याचा संपर्क तुटला. काही दिवस उलटून गेल्यानंतरही अमितचा फोन आला नाही किंवा त्याच्यासोबत कुटुंबीयांचासुद्धा संपर्क झाला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. अमित वाघ याची सासरवाडी अकोल्यातील कीर्ती नगरातील सुरेश वाने ही आहे. त्यांनीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु अमितसोबत संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी खदान पोलीस ठाण्यात तो पत्नी, मुलांसह बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली. खदान पोलिसांनी अमित वाघ याच्या मोबाइलचे लोकेशन शोधले. त्यावेळी त्याचे लोकेशन केरळमध्ये दर्शवित होते. खदान पोलिसांच्या सांगण्यानुसार, नातेवाइकांनी सातारा येथे जाऊन पोलिसांत तक्रार नोंदविली. सातारा पोलिसांनीही त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडील दुसऱ्या मोबाइलचे लोकेशन शोधले. तेव्हा त्याचे लोकेशन गोवा असल्याचे माहिती पडले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या शोधार्थ गोव्याकडे मोर्चा वळविला आहे.

Web Title: Builder's mobile location is in Goa!