बांधकाम व्यावसायिक वाघ, कुटुंबीय सुखरूप

By Admin | Updated: July 1, 2017 01:12 IST2017-07-01T01:12:47+5:302017-07-01T01:12:47+5:30

गोव्यात उपचार घेत असल्याचे आले समोर

Builder Tiger, Family Succinct | बांधकाम व्यावसायिक वाघ, कुटुंबीय सुखरूप

बांधकाम व्यावसायिक वाघ, कुटुंबीय सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्यातील बांधकाम व्यावसायिक अमित वाघ त्यांच्या कुटुंबीयांसह साताऱ्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.त्यांचा कुणाशीही संपकर् नसल्याने हे अख्खे कुटुंबच बेपत्ता झाल्याने पोलिसांनी शोध सुरू केला असता हे कुटुंब गोव्यात सुखरूप असल्याचे शुक्रवारी समोर आले. ते लवकरच अकोल्यात परतणार असल्याचेही त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे.
अकोल्यातील खडकी येथील संतोष नगरात राहणारे तथा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अमित भरत वाघ (३५), त्यांची पत्नी प्रियंका अमित वाघ (२९) आणि मुले स्पंदन (०६), शाश्वत (०३) हे सातारा येथे १३ जूनच्या पूर्वी सुट्यांमध्ये गेले होते. १३ जूनच्या रात्रींपासून अमित वाघ आणि त्यांचे कुटुंबीय अचानक बेपत्ता झाल्याची माहिती सातारा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांचा कसून शोध सुरू केला होता.
या प्रकरणाची तक्रार खदान पोलीस ठाण्यातही करण्यात आली होती. या कुटुंबीयांशी संपकर् होत नसल्याने अकोला, सातारा आणि गोव्यामध्ये लोकेशन मिळाल्याने गोवा पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला होता.
तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर अमित वाघ व त्यांचे कुटुंबीय गोव्यात सुखरूप असल्याचे समोर आले आहे. ते अचानक बेपत्ता झाल्याने विविध तर्कवितर्क लावले जात होते; मात्र काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी संपर्क न झाल्याचे अमित वाघ यांनी स्पष्ट केले आहे. आजाराचे कारण असल्याने ते गोव्यामध्ये उपचारही घेत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

Web Title: Builder Tiger, Family Succinct