अर्थसंकल्प प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:37+5:302021-02-05T06:15:37+5:30

० जयेश रेलकर, सनदी लेखापाल ००००००००००००००००० केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प दिशाभूल करणारा आहे. प्रत्येक गोष्टीचे खासगीकरण करून भारत ...

Budget response | अर्थसंकल्प प्रतिक्रिया

अर्थसंकल्प प्रतिक्रिया

० जयेश रेलकर, सनदी लेखापाल

०००००००००००००००००

केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प दिशाभूल करणारा आहे. प्रत्येक गोष्टीचे खासगीकरण करून भारत आत्मनिर्भर होऊ शकणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना आयकरात दिलेली सूट स्वागतार्ह आहे. सोने व चांदीवरील कस्टम ड्यूटी कमी केली, परंतु साठेबाजीवर कोणतेही नियंत्रण नाही. एकंदरीत, या अर्थसंकल्पातून काहीही निष्पन्न होणार नाही.

० प्रकाश डवले, अर्थतज्ज्ञ

००००००००००

आरोग्य, वीज, जहाज, विमान, पाणी, सामाजिक, कृषी व ग्रामीण क्षेत्रासाठी मोठी तरतूद केल्यामुळे या क्षेत्रात सुधारणा होऊन रोजगार निर्मिती होईल. देशाची आर्थीक स्थिती चांगली नसतानाही कोणतेही नवीन कर न लावल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. करमाफी व वजावट मर्यादा तसेच कर दरात कोणतेही बदल नाहीत. त्यामुळे आयकर कायद्यात सातत्य राहील.

० रमेश चौधरी, सनदी लेखापाल

Web Title: Budget response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.