अकोला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २४ मार्चला

By Admin | Updated: March 9, 2015 01:52 IST2015-03-09T01:52:01+5:302015-03-09T01:52:01+5:30

जिल्हा परिषदेकडून नाविण्यपूर्ण योजना राबविल्या जाण्याची अपेक्षा.

The budget of Akola Zilla Parishad will be held on 24th March | अकोला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २४ मार्चला

अकोला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प २४ मार्चला

अकोला: जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा मंगळवार, २४ मार्च रोजी बोलविण्यात आली असून, या सभेत जिल्हा परिषदेचा यावर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेकडून नाविण्यपूर्ण योजना राबविल्या जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पीय सभेत सन २0१५-१६ यावर्षीचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या वेगवेगळ्या योजनांसह विकासकामांसाठी निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात येणार आहे. सेस फंडातून यावर्षी जिल्हा परिषद कोणकोणत्या योजनांसाठी किती निधी प्रस्तावित करणार, याबाबतचे चित्र अर्थसंकल्पीय सभेत स्पष्ट होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्यास पंधरा दिवसांचा कालावधी उरला असल्याने, विभागनिहाय योजना आणि विकासकामांसाठी अर्थसंकल्पात निधी प्रस्तावित करण्यासाठी संबंधित विभागाची मागणी, प्रस्ताव आणि निधीचा ताळमेळ बसविण्याची तयारी जिल्हा परिषद अर्थ विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

Web Title: The budget of Akola Zilla Parishad will be held on 24th March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.