चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:22 IST2021-08-28T04:22:49+5:302021-08-28T04:22:49+5:30

आराेपीला हाेत्या दाेन पत्नी आराेपी नीतेश खरात याला पहिली पत्नी असून तिच्यापासून त्याला चार अपत्य आहेत़ तर दुसऱ्या पत्नीपासून ...

Brutal murder of wife on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घृण हत्या

आराेपीला हाेत्या दाेन पत्नी

आराेपी नीतेश खरात याला पहिली पत्नी असून तिच्यापासून त्याला चार अपत्य आहेत़ तर दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा व एक मुलगी असून दुसरी पत्नी त्याच्यासाेबत राहत हाेती़ मात्र तिच्यावरही चारित्र्याचा संशय घेत त्याने साेबत असलेल्या दुसऱ्या पत्नीची हत्या केली़ तर पहिली पत्नी माहेरी राहत असल्याची माहिती आहे़ आता दुसऱ्या पत्नीच्या हत्येनंतर दाेन्ही मुले उघड्यावर आली आहेत़

हत्येचा उलगडा अन् आराेपी अटकेत

पत्नीची हत्या अज्ञात मारेकऱ्यांनी केल्याचा बनाव मारेकरी पती नीतेश खरात याने केला़ मात्र पाेलिसांनी दुसऱ्या पत्नीचे माहेर असलेल्या केळीवेळी येथून माहिती घेतली असता नीतेश हा ज्याेतीला नेहमीच मारहाण करीत असल्याची माहिती समाेर आली़ यावरून पाेलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता पाेलिसी खाक्या दाखविताच आराेपीने पत्नीच्या हत्येची कबुली दिली़

Web Title: Brutal murder of wife on suspicion of character