शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

बहिणीला भावाने केला रक्तदानाचा अहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 3:53 PM

बहिणीच्या लग्नामध्ये तिला अहेर म्हणून भावाने चक्क रक्तदानाचा अहेर करीत सामाजिक संदेश दिला.

- विजय शिंदेअकोट: रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान, अशी महती असलेल्या रक्तदानाचा आगळा-वेगळा कार्यक्रम अकोट येथे पार पडलेल्या साबळे व पाटील कुटुंबाच्या लग्नसमारंभात पार पडला. बहिणीच्या लग्नामध्ये तिला अहेर म्हणून भावाने चक्क रक्तदानाचा अहेर करीत सामाजिक संदेश दिला.लग्नसमारंभ मोठ्या थाटामाटात पार पाडले जातात. रुसवे, फुगवे, थट्टा मस्करी, पाहुण्यांच्या भेटीगाठी, शुभमंगलम होऊन अक्षता पडतात. स्नेहभोजन झाल्यानंतर लग्न खूपच चांगले झाले, अशी चर्चा करीत वºहाडी व पाहुणे परततात; परंतु तरोडा येथील साबळे कुटुंबीयांनी या लग्नात जुन्या चालीरितींना फाटा देत रक्तदान शिबिरासारखा सामाजिक उपक्रम श्रद्धासागर येथे पार पडलेल्या लग्नात आयोजित केला होता. सध्या रक्त आणि रक्तघटक ही आरोग्य सेवेतील आवश्यक उपचार प्रणाली झाली आहे. आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो किंवा आज रक्त घेणारा रुग्ण बरा झाल्यावर भविष्यात रक्तदाता असू शकतो, अशा स्थितीत काहीही अपेक्षा न करता दिलेले रक्तदान हे जीवनदान व खरी मानवसेवा ठरते. त्यामुळे लोकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती वाढविण्याच्या दृष्टीने व रक्तदान केल्याने गरीब, गरजू रुग्णांचे प्राण वाचवू शकतो, असा संदेश देण्याकरिता नवरीचा भाऊ मुन्ना ऊर्फ किरण साबळे याने आपल्या बहिणीला अहेर म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अजाबराव साबळे यांची पुतणी पायल गोवर्धन साबळे हिचा शुभविवाह शुभम अरविंद पाटील यांच्यासोबत २६ मे रोजी श्रद्धासागर येथे पार पडला. या शुभविवाह सोहळ्यानिमित्त मुलीचा मोठा भाऊ किरण साबळे व त्याच्या मित्र परिवाराने कुठलीही भेटवस्तू न आणता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराकरिता अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयाच्या रक्तपेढीची निवड केली. तेथील डॉ. शिल्पा तायडे, डॉ. भाग्यश्री घुगे, डॉ. अस्मिता व त्यांच्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन रक्त संकलन केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटBlood Bankरक्तपेढीSocialसामाजिक