शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लग्न लागताच नवरी फुर्र; नवरदेवाला घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 21:05 IST

राजस्थानातील तरुण ठरला औटघटकेचा नवरदेव

अकोला : लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन. सुंदर, सालस मुलगी पसंत करून, लग्न करून सुखी संसार थाटावा, हे प्रत्येकाचे स्वप्न असते; परंतु झालेले लग्न जर औटघटकेचे ठरले तर स्वप्नांचा चुराडा होतो. असाच काहीसा प्रकार सोमवारी दुपारी अकोल्याजवळील रिधोरा गावाजवळ घडला. राजस्थानच्या युवकासोबत लग्नाचे सात फेरे घेतल्यानंतर नवरी व तिचे नातेवाईक ५0 हजार रुपयांसह पसार झाले. फसवणूक झालेल्या युवकाच्या तक्रारीची बाळापूर पोलिसांनी नोंद केली.देखणी, सुंदर मुलगी मिळावी आणि संसार सुखाचा व्हावा, असे स्वप्न अनेक जण रंगवतात. राजस्थानामधील एक ३0 वर्षीय युवक असेच स्वप्न रंगवित असताना, त्याला अकोल्यात एका मध्यस्थ व्यक्तीमार्फत एका युवतीकडून लग्नाचा प्रस्ताव आला. मध्यस्थाने युवती लग्नाची आहे. लग्नासाठी मुलीकडच्या लोकांना खर्चासाठी ५0 हजार रुपये द्यावे लागतील, असे युवकाला सांगितले. युवकही तयार झाला. सोमवारी तो अकोल्यात आल्यावर त्याला खदान परिसरातील एक युवती मध्यस्थाने दाखविली. मुलगी पसंत आल्यावर मध्यस्थाने लग्न उरकून घेण्याची घाई केली. युवकही बोहल्यावर चढण्यास चटकन तयार झाला. मध्यस्थ, युवती आणि तिच्या काही नातेवाइकांनी रिधोरा येथील एका मंदिरामध्ये लग्न लावण्याची तयारी दर्शवल्यानंतर सर्वजण मंदिरात आले. याठिकाणी मध्यस्थ, नातेवाइकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावण्यात आला. एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातल्यानंतर सात फेरे घेण्यात आले आणि लग्न पार पडले. लग्न आटोपले. आता नवरीला राजस्थानला घेऊन जाऊ, या विचारात नवरदेव होता; परंतु आपल्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे, याची त्याला जराही कल्पना नव्हती.रिधोराजवळील एका हॉटेलवर नवरदेवाच्या खर्चाने सर्वांनी अल्पोपहार घेतला. यावेळी नवरी सासरी रवाना होण्यापूर्वी आम्ही तिची नातेवाइकांची शेवटची भेट घडवून आणतो. नंतर नवऱ्या मुलीची भेट होणार नाही, असे नातेवाइकांनी नवरदेवाला सांगितले. नवरदेवानेही होकार दिल्यामुळे नवरीसह तिचे नातेवाईक निघून गेले. काही वेळातच मध्यस्थ व्यक्तीही पसार झाला. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही नवरीला घेऊन तिचे नातेवाईकही आले नाहीत. कोणाचा संपर्क क्रमांक नसल्याने आता काय करावे, या विवंचनेत नवरदेव पडला. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच, नवरदेवाने सोमवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली; परंतु घटनास्थळ हे बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने, पोलिसांनी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे नवरदेवाने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.बनावट लग्न लावून फसवणूक करणारी टोळी सक्रीयलग्नासाठी इच्छुक असलेल्या परप्रांतीय युवकांना हेरून त्यांना मुली दाखवण्यात येतात आणि त्या मुलींचा वापर करून बनावट लग्न लावून युवकांकडून लाखो रुपये उकळले जातात. नंतर काहीतरी कारण सांगून मुलीसह तिचे सहकारीसुद्धा पैसे घेऊन गायब होतात. यापूर्वी अकोल्यात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांवरून अकोल्यात बनावट लग्न लावून फसवणूक करणारी एक टोळीच सक्रिय आहे.

टॅग्स :marriageलग्न