लाचखोर सुनंदा मोरे निलंबित
By Admin | Updated: October 18, 2014 00:46 IST2014-10-18T00:46:23+5:302014-10-18T00:46:23+5:30
एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने केली होती अटक.

लाचखोर सुनंदा मोरे निलंबित
अकोला: एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने अटक केलेल्या सह दुय्यम निबंधक सुनंदा चिंतामण मोरे हिला निलंबित केल्याचे आदेश राज्याचे नोंदणी व मुद्रांक महानिरीक्षक डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले. निलंबन काळात मोरे हिचे ठिकाण अकोलाच राहणार असून, वरिष्ठ अधिकार्यांच्या परवानगीशिवाय तिला मुख्यालय सोडता येणार नसल्याचेही आदेशात म्हटले आहे.
बँकेत गहाण असलेल्या प्लॉटवर बोजा चढवायला आवश्यक असलेल्या खतावणी प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराकडून एक हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या सहायक उपनिबंधक सुनंदा चिंतामण मोरे व तिचे सहकारी आशीष पिंजरकर, हिंमत शिराळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सुनंदा मोरे हिच्या दुर्गा चौकातील निवासस्थानाची झडती घेतली होती. झडतीदरम्यान मोरेकडे ३३ लाख रुपयांची संपत्ती व पुण्यामध्ये बंगला आढळून आला होता.