महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकास अटक

By Admin | Updated: May 8, 2015 01:50 IST2015-05-08T01:50:13+5:302015-05-08T01:50:13+5:30

आपातापा येथील महावितरण कार्यालयातील प्रकार.

Bribery Junior script of MSEDCL | महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकास अटक

महावितरणच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकास अटक

अकोला : आपातापा येथील महावितरण कार्यालयातील कॅटरिंग देयक मंजुरीसाठी कंत्राटदाराला ३ हजार रुपयांची लाच मागणार्‍या कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत विभागाने गुरुवारी रंगेहात पकडले. आपातापा रोडस्थित ४00 के.व्ही. महावितरण कार्यालयातील कॅटरिंगच्या कंत्राटदाराचे मार्च २0१५ चे ३३ हजार ४७४ रुपयांचे देयक महावितरणाकडे प्रलंबित होते. प्रलंबित देयक मंजुरीसाठी अकोला येथील महावितरणाचे मुख्य कार्यालय विद्युत भवन येथे पाठवावे लागणार असल्याचे सांगत येथील कनिष्ठ लिपिक प्रमोद लक्ष्मण देशमुख (वय ५१ वर्षे) याने कंत्राटदाराला ३ हजार रुपयांची मागणी केली. कंत्राटदाराने या प्रकरणी अकोला लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या प्रकरणी लाचलुचपत विभागाने पंचासमक्ष पडताळणी केल्यावर लाचेची मागणी असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने लाचलुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी गुरुवार ७ मे रोजी आपातापा येथील महावितरण कार्यालयात सापळा रचला. दरम्यान, कंत्राटदाराने देशमुख यांना देयक मंजुरीसाठी मागितलेल्या रकमेची पूर्तता केली; परंतु आरोपी देशमुख याला संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. कंत्राटदाराच्या या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या अधिकार्‍यांनी आरोपी प्रमोद देशमुख याला अटक करण्यात आली. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी रामदासपेठ पोलिस स्थानकात आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Web Title: Bribery Junior script of MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.