लाचखोर महिला तलाठय़ास अटक
By Admin | Updated: September 12, 2014 00:13 IST2014-09-12T00:13:05+5:302014-09-12T00:13:05+5:30
खामगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लाचखोर महिला तलाठय़ास अटक
खामगाव : पिकाच्या नुकसानीच्या धनादेशाची तारीख वाढवून देण्यासाठी एक हजाराची लाच मागणार्या तलाठी महिलेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडून गुन्हा दाखल केला. ही कारवाई आज ११ सप्टेंबर रोजी स्थानिक वामन नगरातील तलाठी कार्यालयात करण्यात आली.
तालुक्यातील अटाळी येथील गजानन चंद्रभान घटे यांच्या आईच्या नावे शेतातील पिकाच्या नुकसानीपोटी अनुदानाचा धनादेश मिळाला होता; मात्र या धनादेशावरील तारीख निघून गेल्याने गजानन घटे यांनी या धनादेशावरील तारीख वाढवून देण्याची मागणी अटाळीच्या तलाठी वैशाली रमेश मालोदे (वय ३६) रा. राजेश्वर नगर बुलडाणा यांचेकडे केली होती; मात्र त्यास टाळाटाळ करून तारीख वाढवून देण्यासाठी तलाठी वैशाली मालोदे यांनी गजानन घटे यांना एक हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यामुळे गजानन घटे यांनी लाचलुचपत प्र ितबंधक विभागाकडे धाव घेऊन याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सा पळा रचून आज खामगाव येथील वामन नगर भागात असलेले वैशाली मालोदे यांचे तलाठी कार्यालय गाठले; मात्र यावेळी लाचेची रक्कम वैशाली मालोदे यांनी स्वत: न स्वीकारता त्यांचे अनधिकृत कर्मचारी गजानन रामकृष्ण जवंजाळ (वय ३0) रा. नायदेवी ता. खामगाव यांना घेण्यास सांगितली. त्यावरून लाचेची रक्कम गजानन जवंजाळ हा स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
या प्रकरणी तलाठी वैशाली रमेश मालोदे व गजानन जवंजाळ यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस स्टेशन येथे कलम ७, १२, १३, (१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत प्र ितबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवला आहे.