महादेव, राहुल, नेहाचे चित्तथरारक प्रदर्शन

By Admin | Updated: August 13, 2015 01:10 IST2015-08-13T01:10:40+5:302015-08-13T01:10:40+5:30

अकोल्यात शालेय मलखांब स्पर्धा.

The breathtaking performance of Mahadev, Rahul, Neha | महादेव, राहुल, नेहाचे चित्तथरारक प्रदर्शन

महादेव, राहुल, नेहाचे चित्तथरारक प्रदर्शन

अकोला: कुंभारीतील जय बजरंग विद्यालयाच्या सभागृहात बुधवारी झालेल्या जिल्हास्तरीय शालेय मलखांब स्पर्धेत महादेव इंगळे, राहुल पवार आणि नेहा गवई यांनी चित्तथरारक प्रदर्शन करीत सर्वाधिक गुणांची कमाई करीत प्रथम स्थान प्राप्त केले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जय बजरंग विद्यालयाच्या विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेत १७ वर्षाआतील मुलांच्या गटात महादेव इंगळे, नंदकिशोर फाटकर, मंथन भाठरकर, लखन राठोड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ स्थान मिळविले. १९ वर्षाआतील मुलांच्या गटात राहुल पवार याने प्रथम, केशव हरमकर द्वितीय, आशिष जठाळ तृतीय आणि सय्यद रसुल याने चौथे स्थान पटकाविले. मुलींच्या गटात नेहा गवई हिने प्रथम स्थान मिळविले. साक्षी लोखंडे द्वितीय, मोनाली देशमुख तृतीय आणि ज्योती उमाळे हिने चौथे स्थान मिळविले. खेळाडूंनी मलखांब व रोप मलखांबमध्ये प्रदर्शन केले.

Web Title: The breathtaking performance of Mahadev, Rahul, Neha