काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता उखडला
By Admin | Updated: May 15, 2014 19:34 IST2014-05-15T16:31:32+5:302014-05-15T19:34:21+5:30
बोरगाव वैराळे ते अंदुरा रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच हा रस्ता उखडायला सुरुवात झाली आहे.

काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता उखडला
बोरगाव वैराळे: सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर झालेल्या बोरगाव वैराळे ते अंदुरा या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच हा रस्ता उखडायला सुरुवात झाल्यामुळे कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह लागले आहे. बोरगाव वैराळे ते अंदुरादरम्यानच्या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण शासनाकडून विविध योजनेंतर्गत मंजूर केले असून, त्यातील एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभाग, दोन किलोमीटर अंतराचे काम जि.प. बांधकाम विभाग आणि उर्वरित दोन किलोमीटर रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधक ाम विभागातर्फे एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम लवकरच सुरू करून ६०० मीटर अंतराचे बी.बी.एम. डांबर टाकून करण्यात आले. या कामाला अवघे १५ दिवसही पूर्ण होत नाही तोच हा रस्ता उखडत चालला आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर निघाल्यामुळे या ६०० मीटर अंतरावर कित्येक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातही हे काम करीत असताना बोरगाव वैराळेनजीकचे ३०० मीटर अंतराचे काम सोडून देण्यात आले, तर चांगल्या स्थितीत असलेल्या ६०० मीटर अंतराच्या रस्त्याचे काम कंत्राटदाराने केले. एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम मंजूर झाले असताना केवळ ६०० मीटर अंतराचे काम करण्यात आले आणि तेसुद्धा निकृ ष्ट दर्जाचे करण्यात आले. संबंधित कंत्राटदाराकडून उर्वरित ४०० मीटर अंतरासह उखडलेल्या ६० मीटर अंतराचे कामही पुन्हा करून घेण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.