अकोला जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाला ‘ब्रेक’!
By Admin | Updated: October 28, 2014 00:29 IST2014-10-28T00:29:38+5:302014-10-28T00:29:38+5:30
‘लालफिती’चा फटका: पर्यावरण विभागाच्या परवानगीत अडकला १८८ रेतीघाटांचा लिलाव.

अकोला जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाला ‘ब्रेक’!
संतोष येलकर/अकोला
गतवर्षीच्या रेतीघाटांच्या लिलावाची मुदत संपुष्टात येऊन २६ दिवसांचा कालावधी उलटून गेला. यावर्षी जिल्ह्यातील लिलावासाठी पूर्वपरवानगीकरिता १८८ रेतीघाटांचा प्रस्ताव राज्य पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या विभागाकडून प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळणे बाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलाव प्रक्रियेस ह्यब्रेकह्ण लागला आहे.
गतवर्षी जिल्ह्यातील २५७ रेतीघाटांपैकी १५२ रेतीघाटांचा लिलाव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आला. त्यामधून ९ कोटी ७२ लाख २३ हजार ९९५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.
गतवर्षी लिलाव करण्यात आलेल्या जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत ३0 सप्टेंबर रोजी संपुष्टा त आली. दरम्यान, यावर्षी लिलावास योग्य जिल्ह्यातील १८८ रेतीघाटांचा प्रस्ताव जिल्हा खनिकर्म विभागाकडून राज्य पर्यावरण विभागाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला. परं तु,या रेतीघाटांच्या प्रस्तावाला अद्याप पर्यावरण विभागाकडून मान्यता प्राप्त झाली नाही.
त्यामुळे गतवर्षीच्या रेतीघाटांच्या लिलावाची मुदत संपुष्टात येऊन २६ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी पर्यावरण विभागाच्या परवानगीअभावी जिल्ह्यातील रेतीघाटांची यावर्षीची लिलाव प्रक्रिया सुरू झालेली नाही. पर्यावरण विभागाच्या परवानगीत १८८ रेतीघाटांचा लिलाव अडकल्याच्या स्थितीने जिल्ह्यातील रेतीघाटांच्या लिलावाला ह्यब्रेकह्ण लागला आहे. त्यानुषंगाने पर्यावरण विभागाकडून रेतीघाटांच्या लिलावाची परवानगी केव्हा प्राप्त होते, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.