वाढदिवसापासून मुलगा बेपत्ता, अपहरणाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:19 IST2021-05-11T04:19:42+5:302021-05-11T04:19:42+5:30

गत सहा दिवसांपासून त्याचे आईवडील त्याची प्रतीक्षा करीत आहेत. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. ...

Boy missing since birthday, suspected kidnapping | वाढदिवसापासून मुलगा बेपत्ता, अपहरणाचा संशय

वाढदिवसापासून मुलगा बेपत्ता, अपहरणाचा संशय

गत सहा दिवसांपासून त्याचे आईवडील त्याची प्रतीक्षा करीत आहेत. या प्रकरणी अकोट शहर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. रामटेकपुरा येथील शंकर परशराम लटकुटे या शेतमजुराला दोन मुले आहेत. मोठा मुलगा पुण्याला काम करतो. बेपत्ता झालेला लहान मुलगा विष्णू लटकुटे हा शिक्षण घेत आहे. विष्णूचा ४ मे रोजी आईवडिलांनी वाढदिवस साजरा केला होता. वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री ८.३० वाजता दरम्यान विष्णूने बाहेर शौचास जात असल्याचे सांगितले. रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्याचा शोध घेतला. त्यांच्या वडिलांनी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये ५ मे रोजी फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा करण्यात आला आहे. विष्णूच्या अंगात लांब बाह्यांचे निळ्या रंगाचे शर्ट व निळसर रंगाचा पॅन्ट, उंची ५.५ असून रंग गोरा, बांधा सडपातळ, उजव्या गालावर काळा तीळ आहे.

Web Title: Boy missing since birthday, suspected kidnapping