काठीने मारहाण करून मुलाने केली पित्याची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:19 IST2021-04-07T04:19:12+5:302021-04-07T04:19:12+5:30

डोंगरगाव येथील अर्जुन उकर्डा सहारे (६२) व त्यांचा मुलगा अनिल उकर्डा सहारे (२२) या बापलेकांमध्ये सोमवारी रात्री ९.३० च्या ...

The boy killed his father by beating him with a stick | काठीने मारहाण करून मुलाने केली पित्याची हत्या

काठीने मारहाण करून मुलाने केली पित्याची हत्या

डोंगरगाव येथील अर्जुन उकर्डा सहारे (६२) व त्यांचा मुलगा अनिल उकर्डा सहारे (२२) या बापलेकांमध्ये सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने, मुलगा अनिल सहारे याने रागाच्या भरात जन्मदात्या पित्याला काठीने मारहाण केली. या मारहाणीत पिता अर्जुन सहारे हे गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, ठाणेदार सुनील सोळंके, पीएसआय वीणा पांडे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन घटनेचा व मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. दरम्यान, राजेश नेवारे यांच्या तक्रारीनुसार आरोपी अनिल सहारे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपीस पोलिसांनी अटक केली. पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके करीत आहेत.

Web Title: The boy killed his father by beating him with a stick