लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नाशिक शहरातून पळून आलेल्या प्रेमी युगुल यांना सिव्हिल लाइन पोलिसांच्या मदतीने नाशिक पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अकोल्यातील न्यू तापडिया नगर भागातून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यास आले. युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला नाशिक पोलिसांनी अटक केली. नाशिक जिल्हय़ातील सातपूर गावात राहणार्या डिगांबर उत्तम जगताप (२0) याने नाशिक शहरात राहणार्या १७ वर्षीय मुलीला प्रेमजाळय़ात अडकविले आणि तिला फूस लावून अकोल्यात आणले. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. अल्पवयीन मुलीला घेऊन युवक अकोल्यात असल्याची माहिती नाशिक पोलिसांना मिळाली. नाशिक पोलिसांनी शुक्रवारी मुलीच्या पालकांना घेऊन अकोला गाठले. सिव्हिल लाइन पोलिसांनासुद्धा घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली. सिव्हिल लाइनचे ठाणेदार अन्वर शेख यांनी नाशिक पोलिसांसोबत न्यू तापडिया नगरात जाऊन एका घरातून युवकासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. या ठिकाणी मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले. आरोपीला युवकाला घेऊन नाशिक पोलीससुद्धा रवाना झाले.
नाशिकहून पळून आलेले प्रेमी युगुल अकोल्यात पकडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 20:06 IST
अकोला : नाशिक शहरातून पळून आलेल्या प्रेमी युगुल यांना सिव्हिल लाइन पोलिसांच्या मदतीने नाशिक पोलिसांनी शुक्रवारी दुपारी अकोल्यातील न्यू तापडिया नगर भागातून ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलीस तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यास आले. युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला नाशिक पोलिसांनी अटक केली.
नाशिकहून पळून आलेले प्रेमी युगुल अकोल्यात पकडले!
ठळक मुद्देअल्पवयीन मुलगी पालकांच्या स्वाधीनसिव्हिल लाइन पोलिसांच्या मदतीने नाशिक पोलिसांची कारवाई