जठारपेठ परिसरात इमारतीवरून कोसळून मुलगा ठार
By Admin | Updated: October 25, 2014 01:06 IST2014-10-25T00:55:52+5:302014-10-25T01:06:50+5:30
सहाव्या मजल्यावरून खाली कोसळून १४ वर्षीय मुलगा ठार;आकस्मिक मृत्यूची नोंद.

जठारपेठ परिसरात इमारतीवरून कोसळून मुलगा ठार
अकोला : जठारपेठ परिसरातील गजानन रेसिडन्सीमधील सहाव्या मजल्यावरून खाली कोसळून १४ वर्षीय मुलगा ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
जठारपेठ परिसरातील गजानन रेसिडन्सीमधील रहिवासी गजानन मोठाड यांचा १४ वर्षीय मुलगा साहिल हा दिवाळीच्या सुट्या असल्याने घरीच होता. त्याने दुपारनंतर रेसिडन्सीचे छत गाठून पतंग उडविण्यास सुरुवात केली. छतावर आवश्यक त्या उपाय-योजना न केल्याने तोल जाऊन हा मुलगा थेट जमिनीवर कोसळला. सहाव्या मजल्यावरून कोसळल्याने त्याच्या शरीरावर जखमा, तर डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान साहिलचा रात्री मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.