मूर्तिजापुरातील दोन्ही आठवडी बाजार कोरोनामुळे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:52 IST2021-02-20T04:52:29+5:302021-02-20T04:52:29+5:30

- मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यासह मूर्तिजापूर तालुक्यातील कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव विचारात घेता येथील दोन्ही आठवडी बाजार प्रशासनाने ...

Both the weekly markets in Murtijapur are closed due to corona | मूर्तिजापुरातील दोन्ही आठवडी बाजार कोरोनामुळे बंद

मूर्तिजापुरातील दोन्ही आठवडी बाजार कोरोनामुळे बंद

-

मूर्तिजापूर : अकोला जिल्ह्यासह मूर्तिजापूर तालुक्यातील कोरोनाचा झपाट्याने होणारा प्रादुर्भाव विचारात घेता येथील दोन्ही आठवडी बाजार प्रशासनाने बंद केले आहेत.

या शहरात शुक्रवार व मंगळवार, असे २ दिवस अनुक्रमे जुनी वस्ती व स्टेशन विभाग अशा २ भागांकरिता २ आठवडी बाजार भरतात. दोन्ही बाजारांमाध्ये ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी कोरोना संक्रमणाला गतिमान करु शकते, ही भिती लक्षात घेऊन उप विभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी हे दोन्ही आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश निर्गमित केला असून बाजारात माल घेऊन येणाऱ्या व्यापाऱ्यांचा माल जप्त करून दंडात्मक करण्यात येईल, असा इशारा देऊन व्यापारी, नागरिक, ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनावर मातकरण्यासाठीच्या त्रिसूत्रीचे उल्लंघन करून मास्क न वापरणाऱ्या ७० जणांवर दंडात्मक कारवाई करून महसूल, पोलीस व पालिका प्रशासनाच्या पथकांनी मुख्याधिकारी विजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनात १४ हजार रूपये दंड वसूल केला.

Web Title: Both the weekly markets in Murtijapur are closed due to corona