दुकानात हैदोस घालणा-या दोघांना अटक

By Admin | Updated: March 7, 2016 02:32 IST2016-03-07T02:32:08+5:302016-03-07T02:32:08+5:30

अकोला येथील रतनलाल प्लॉट चौकातील घटना.

Both of them were arrested in the shop | दुकानात हैदोस घालणा-या दोघांना अटक

दुकानात हैदोस घालणा-या दोघांना अटक

अकोला: रतनलाल प्लॉट चौकातील धन्यवाद ग्रीटिंग्स नामक दुकानात रविवारी सकाळी हैदोस घालणार्‍या दोघांविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांना अटक करण्यात आली आहे. गोकुळ कॉलनी येथील रहिवासी नवलकिशोर दयाचंद अग्रवाल यांनी रतनलाल प्लॉट चौकात एक दुकान भाड्याने घेतले आहे. या दुकानामध्ये त्यांनी ग्रीटिंग्स व्यवसाय सुरू केला आहे. रविवारी सकाळी त्यांचे दुकान कुलूपबंद असताना तारफैल परिसरातील व्हीएचबी कॉलनी येथील रहिवासी अनिस अहेमद पटेल व जठारपेठेतील चिंतामनी अपार्टमेंट येथील रहिवासी अनिल किसन शिंदे या दोघांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील ग्रीटिंग्सची नासधूस करून हैदोस घातल्याची तक्रार अग्रवाल यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीवरून पोलिसांनी अनिस पटेल व अनिल शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक करण्यात आली.

Web Title: Both of them were arrested in the shop