तलवार घेऊन फिरणारे दोघे गजाआड
By Admin | Updated: March 3, 2017 01:46 IST2017-03-03T01:46:31+5:302017-03-03T01:46:31+5:30
आपातापा चौक परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघा जणांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली.

तलवार घेऊन फिरणारे दोघे गजाआड
अकोला, दि.२ : आपातापा चौक परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार घेऊन फिरणाऱ्या दोघा जणांना अकोट फैल पोलिसांनी गुरुवारी दुपारी अटक केली. त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
चिखलपुरा परिसरात राहणारा गोपाल भुजंगराव कदम व त्याचा भाऊ सोनू हे आपातापा चौक परिसरात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती अकोट फैल पोलीस ठाण्यातील प्रभारी ठाणेदार तिरुपती राणे यांना मिळाली. त्यांनी परिसरात आरोपींचा शोध घेतला असता, गोपाल कदम व सोनू कदम हे तलवार घेऊन फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडील धारदार तलवार जप्त केली. आरोपींना गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांनाही एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गोपाल कदम हा मनपा निवडणुकीत एका राजकीय पक्षाकडून उमेदवार होता; परंतु तो पराभूत झाला. (प्रतिनिधी)