खून प्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: May 17, 2014 19:00 IST2014-05-17T18:36:03+5:302014-05-17T19:00:25+5:30
पातूर तालुक्यातील एका तरुणाच्या हत्येप्रकरणी चान्नी पोलिसांनी शनिवारी दोन आरोपींना अटक केली.

खून प्रकरणी दोघांना अटक
पातूर : तालुक्यातील अंधार सांगवी घाटात झालेल्या एका तरुणाच्या हत्येप्रकरणी चान्नी पोलिसांनी शनिवारी दोन आरोपींना अटक केली.
चान्नी पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या अंधार सांगवी घाटात १४ मे रोजी रामप्रल्हाद पायघन (२३, रा. वारा जहाँगीर, जि. वाशिम) याचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या अंगावर कुर्हाडीचे घाव होते. या प्रकरणी चान्नी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. शेतीच्या वादातून खून झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी कैलास ज्ञानेश्वर दोनचर (२२) व सोपान श्रीकृष्ण नागूलकर (२८) दोघेही रा. वारा जहाँगीर यांना पहाटे ३.३० वाजात अटक केली.