निराधार वृद्धांना मायेची ऊब; तहसीलदार पवारांनी दिली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:18 IST2021-05-10T04:18:08+5:302021-05-10T04:18:08+5:30

येथील महात्मा फुले वृद्धाश्रमातील वृद्धांची भेट घेऊन 'लोकमत' ने भेटीगाठीसोबतच मदतही आटली; वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी' असे वृत्त प्रकाशित करताच ...

The boredom of love to the destitute old; Tehsildar Pawar gave help | निराधार वृद्धांना मायेची ऊब; तहसीलदार पवारांनी दिली मदत

निराधार वृद्धांना मायेची ऊब; तहसीलदार पवारांनी दिली मदत

येथील महात्मा फुले वृद्धाश्रमातील वृद्धांची भेट घेऊन 'लोकमत' ने भेटीगाठीसोबतच मदतही आटली; वृद्धाश्रमात आजी-आजोबा एकाकी' असे वृत्त प्रकाशित करताच समाजातील अनेक हात मदतीसाठी पुढे आले आहेत. तहसीलदार प्रदीप पवार यांनीही वृद्धाश्रमाला मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. त्याआनुषंगाने शुक्रवारी वृद्धाश्रमाला सपत्नीक भेट देऊन उपस्थित वृद्धांना खाद्यपदार्थ वाटप करून २१ हजार रुपयांत एक फ्रिज व त्यांना बसण्यासाठी बाकडे खरेदी करून भेट देण्यात आले आहेत.

१८ एप्रिल रोजी सदर वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांच्या भावना जाणून घेऊन १९ एप्रिल रोजी वृत्त प्रकाशित करताच समाजमन जागृत होऊन वृद्धाश्रमाला विविध माध्यमांतून मदत व्हायला लागली आहे.

फोटो:

Web Title: The boredom of love to the destitute old; Tehsildar Pawar gave help