बोंडअळीच्या नियंत्रणासाठी अकोला जिल्ह्यात फिरणार चित्ररथ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 13:06 IST2018-08-14T13:06:13+5:302018-08-14T13:06:53+5:30

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी अकोला जिल्ह्यात फिरणार चित्ररथ!
अकोला : कापूस पिकावरील शेंदरी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता रासी सीडस या कंपनीने तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आणि प्रसिद्ध उद्योजिका पदमश्री कल्पना सरोज यांनी आज हिरवी झेंडी दाखवली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, रासी सीडसचे विभागीय व्यवस्थापक सुनील महाजन, जिल्हा व्यवस्थापक उमेश भगत आदी उपस्थित होते.
हा चित्ररथ बोंडअळीच्या नियंत्रणासाठी सुमारे एक महिना अकोला जिल्ह्यातील १७५ गावांमध्ये फिरवला जाणार आहे. विशेषत: कापसाचे मुख्य क्षेत्र असणाºया अकोट व तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. दररोज सात गावांत हा चित्ररथ फिरणार आहे. या दरम्यान कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शेतावरही जाऊन शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जनजागृतीदरम्यान शेतकºयांना सुमारे दोन हजार कामगंध सापळ्यांचे वाटप केले जाणार आहे.