शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिजापूर स्टेशनवर 'शकुंतला' पॅसेंजरची एक बोगी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 13:14 IST

मूर्तिजापूर : मूर्तिजापूर जंक्शन स्टेशन वर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरच्या चार डब्यांपैकी गार्ड बोगीला आग लागल्याने बोगी भस्मसात झाली. असून सांगाडा शिल्लक राहिला आहे.

-  संजय उमकमूर्तिजापूर : मूर्तिजापूर जंक्शन स्टेशन वर उभ्या असलेल्या शकुंतला पॅसेंजरच्या चार डब्यांपैकी गार्ड बोगीला आग लागल्याने बोगी भस्मसात झाली. असून सांगाडा शिल्लक राहिला आहे. घटना बुधवारी रात्री १२:३० वाजताचे दरम्यान घडली. या आगीत जीवीत हानी झाली नसली तरी रेल्वे प्रशासनाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.      बुधवारी मध्यरात्री रेल्वे रुळावर चार डब्यांची मूर्तिजापूर - अचलपूर उभी असलेली शकुंतला पॅसेंजरच्या गार्ड बोगीला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. मूर्तिजापूर - यवतमाळ व मूर्तिजापूर - अचलपूर अशा दोन शकुंतला पॅसेंजर या रेल्वे स्थानकावरून सकाळी ७:१५ वाजता धावतात. परंतु मूर्तिजापूर यवतमाळ ही शकुंतला पॅसेंजर काही कारणास्तव अनेक महिन्यांपासून बंद आहे. दरम्यान, मूर्तिजापूर - अचलपूर ही गाडी नियमित असून, अचलपूर वरुन  संध्याकाळी मूर्तिजापूर येथे परत येते. नेहमी प्रमाणे मंगळवारी संध्याकाळी परत आलेली गाडी रेल्वे रुळावर मुक्कामी असते. दरम्यान रळावर डबे सोडून इंजिन लोको शेड मध्ये जमा होते. अशाच प्रकारे चार डबे रुळावर उभे असताना रात्री १२:३० वाजता गार्ड बोगीने अचानक पेट घेतला असता पहातात बोगी जागीच जळत राहिली. दरम्यान जळीत बोगीला चिकटलेले तीन डबे उपस्थितांनी सोडून ढकलत बाजूला केल्याने अधिक नुकसान टळले अन्यथा संपूर्ण गाडीच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.       आग विझविण्यासाठी मूर्तिजापूर नगरपरिषदेच्या अग्नि शामक दलाला पाचारण करण्यात आले होते परंतू रुळांच्या व खड्ड्यांच्या अडथळ्यांमुळे अग्नि शमन दलाचा बंब घटनास्थळापासू खूप दुर ऊभा करावा लागल्याने तो पेट घेतलेल्या बोगी पर्यंत पोहोचूच शकला नाही त्यामुळे रात्री ३:३० उशिरापर्यंत बोगी जळत राहिली. परंतू रेल्वे स्थानकावर असलेल्या नळातून पाणी घेऊन बघ्यांनी आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाही.

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरrailwayरेल्वेfireआग