वारी येथील वान नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST2021-08-23T04:21:38+5:302021-08-23T04:21:38+5:30

तेल्हारा/संग्रामपूर : वारी भैरवगड येथील वान नदीपात्रात शनिवारी वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात ...

The body of a youth was found washed away in the Wan river basin at Wari | वारी येथील वान नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

वारी येथील वान नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह सापडला

तेल्हारा/संग्रामपूर : वारी भैरवगड येथील वान नदीपात्रात शनिवारी वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह रविवारी तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात आढळून आला. अनिल रामकृष्ण सरोकार (२४, रा. खांडवी, ता. जळगाव जामोद) असे या युवकाचे नाव असून, तो गृहरक्षक दलाचा जवान असल्याचे समजते.

वारी येथील हनुमान सागर धरणाचे चार दरवाजे शनिवारी दिवसभर उघडण्यात आले होते. त्यामुळे वाहन नदीला पूर आला होता. जळगाव जा. तालुक्यातील खांडवी येथील अनिल रामकृष्ण सारोकार हा युवक सेल्फी काढण्यासाठी वान नदीपात्रात उतरला होता. सेल्फी काढत असतानाच त्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडून वाहून गेला. याबाबत नातेवाइकांनी रविवारी सोनाळा पोलीस स्टेशन गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. सोनाळा पोलिसांकडून नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाला शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. दरम्यान, तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात या युवकाचा मृतदेह आढळून आला.

Web Title: The body of a youth was found washed away in the Wan river basin at Wari