स्थानिक नागरिकाचा मृतदेह सकाळी आढळला
By सुदाम देशमुख | Updated: May 24, 2024 09:29 IST2024-05-24T09:29:16+5:302024-05-24T09:29:48+5:30
सहावा बेपत्ता नागरिकाचा मृतदेह आज आढळून आला.

स्थानिक नागरिकाचा मृतदेह सकाळी आढळला
अकोले : प्रवरापात्रातील बेपत्ता स्थानिक तरुण गणेश मधुकर देशमुख यांचा मृतदेह सकाळी आढळून आला आहे. ठाणे येथून आलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन पथकाला सकाळी ७ वाजताच हा मृतदेह आढळला. या पथकाचे नेतृत्व सचिन डुबे यांनी केले.
बुधवारी बुडालेला तरूण अर्जुन रामदास जेडगुले हा अद्याप सापडला नसून हे पथक त्याचा शोध घेत आहे. याच तरुणाच्या शोधासाठी एसडीआर एफ चे पाच जवान व एक स्थानिक नागरिकांची टीम काल बोटीतून शोध घेत होती. यावेळेस दुर्घटना घडून सहा जण बुडाले होते. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला, दोघे रुग्णालयात उपचार घेत असून सहावा बेपत्ता नागरिकाचा मृतदेह आज आढळून आला.