बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:18 IST2021-04-16T04:18:39+5:302021-04-16T04:18:39+5:30
बुधवारी सकाळी १५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला होता. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग ६ वरील मन नदीच्या पुलावर ...

बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला
बुधवारी सकाळी १५ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळला होता. मंगळवारी राष्ट्रीय महामार्ग ६ वरील मन नदीच्या पुलावर दुचाकी व इतर साहित्य बेवारस स्थितीत आढळल्यावर बाळापूर पोलिसांनी चौकशी तपास सुरू केला होता़ मुलगा व आईने आत्महत्या केली की, हत्या याबाबत चर्चा सुरू हाेती़ महिलेच्या भावाने बेवारस मोटारसायकल व साहित्य बहीण व भाच्याचे असल्याची ओळख पटली़ दरम्यान, मृत महिलेच्या दुसऱ्या पतीला बाळापूर पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलावले़ त्यावेळी मृत महिलेच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत ‘तो मी नव्हे’ म्हणत आत्महत्या करण्याचा देखावा करून विष प्राशन करून पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. महिला व मुलाचे मृतदेह सापडल्यावर महिलेला व मुलाला तिचा पती मानसिक, शारीरिक व आर्थिक त्रास देऊन महिलेवर संशय घेऊन त्रास देत असल्याने दोघांनी मंगळवारी मन नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून बाळापूर पोलीस काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.