शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

शासन सेवेतील ‘बीएएमएस’ डॉक्टर अजूनही ‘ऑक्सिजन’वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:57 AM

अकोला : महाराष्ट्राच्या शासन सेवेत असलेल्या ७८९ ‘बीएएमएस’ डॉक्टरांच्या समस्या अजूनही ‘जैसे थे’ असून, या डॉक्टरांना कायम करण्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेले आश्‍वासन ऑक्सिजनवरच आहे. 

ठळक मुद्देकॅबिनेटचा निर्णय होऊनही अद्याप कायम करण्याचा आदेश नाही!

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्राच्या शासन सेवेत असलेल्या ७८९ ‘बीएएमएस’ डॉक्टरांच्या समस्या अजूनही ‘जैसे थे’ असून, या डॉक्टरांना कायम करण्याचे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेले आश्‍वासन ऑक्सिजनवरच आहे. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील दुर्गम भागात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ७८९ बीएएमएस डॉक्टर दहा ते बारा वर्षांपासून सेवा देत आहेत. गेल्या बारा वर्षांपासून आरोग्यसेवा देणार्‍या या डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीने वापरले जात असून, शासनाच्या कोणत्याही स्थायी स्वरूपाच्या सवलती त्यांना दिल्या जात नाहीत. न्याय हक्कासाठी राज्यभरातील मागील हिवाळी अधिवेशनात आंदोलन छेडले होते. ७८९ अस्थायी बीएएमएस डॉक्टरांना स्थायी स्वरूपात कायम करण्यात येईल, असे आश्‍वासन सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिले. दरम्यान, ऑगस्ट १७ मध्ये झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत निर्णयही झाला. त्यानंतर राज्याच्या पाचही आरोग्य मंडळातील शासन सेवेतील ‘बीएएमएस’ असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांची यादी मंत्रालयाने मागवून घेतली. या घटनेलादेखील आता काळ लोटला; मात्र अजून कोणताही आदेश या डॉक्टरांना प्राप्त झाला नाही. ‘बीएएमएस’ची संघटना मंत्रालयात नोंदणीकृत नसल्याने नवा पेच निर्माण झालेला आहे. त्यावर पुन्हा आरोग्यमंत्री सावंत यांच्याशी बोलणे सुरू आहे.दरम्यान, ‘एमबीबीएस’ असलेल्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी ‘बीएएमएस’च्या डॉक्टरांना स्वीकारलेले नसल्याने संघटनेत त्यांना स्थान नाही. त्यामुळे ७८९ अस्थायी ‘बीएएमएस’ डॉक्टरांच्या मागणीकडे पुन्हा शासनाने पाठ फिरविली आहे. ‘बीएएमएस’ डॉक्टरांना न्याय मिळावा म्हणून मॅग्मोचे राज्याध्यक्ष डॉ. विजय जाधव, सचिव डॉ. बाळासाहेब देशमुख, सरचिटणीस डॉ. अरुण कोळी यांच्या नेतृत्वात शेकडो डॉक्टरांनी आंदोलन केले होते. आता मॅग्मोची भूमिकादेखील अस्पष्ट झाली आहे. ऑक्सिजनवर असलेल्या राज्यातील शेकडो डॉक्टरांना न्याय कधी मिळतो, याकडे आता वैद्यकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरAkola cityअकोला शहर