वाहनाने उडवले, दुचाकीवरील युवकासह वृद्ध गंभीर जखमी
By सचिन राऊत | Updated: February 4, 2024 17:58 IST2024-02-04T17:56:29+5:302024-02-04T17:58:59+5:30
शहरातील युवक व वृध्द एम एच ३७ एक्स ७४१० क्रमांकाच्या दुचाकीने जात असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.

वाहनाने उडवले, दुचाकीवरील युवकासह वृद्ध गंभीर जखमी
अकोला: एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील पीकेव्हीच्या मुख्य प्रवेशद्वारासमाेर दुचाकीचा भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात वृध्द व युवक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सर्वाेपचार रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शहरातील युवक व वृध्द एम एच ३७ एक्स ७४१० क्रमांकाच्या दुचाकीने जात असतांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली.
या अपघातात गाेपाल नामक युवक व त्यांच्यासाेबत असलेले वृध्द गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी या अपघाताची माहीती एमआयडीसी पाेलिसांना देताच पाेलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जखमींना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वाेपचार रुग्णालयात दाखल केले. पाेलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून वाहन चालकाविराेधात गुन्हा दाखल केला आहे. जखमींची प्रकृती ठिक असल्याची माहीती वैद्यकीय सूत्रांनी दिली असून या अपघाताचा तपास एमआयडीसी पाेलिस करीत आहेत.