रागाच्या भरात पतीचे डोके फोडले!

By Admin | Updated: October 26, 2015 01:52 IST2015-10-26T01:52:32+5:302015-10-26T01:52:32+5:30

स्वयंपाक का केला नसल्याची विचारणा करायला गेलेल्या पतीला पत्नीने मारहाण करून डोके फोडले.

Blow the head of the husband! | रागाच्या भरात पतीचे डोके फोडले!

रागाच्या भरात पतीचे डोके फोडले!

मालेगाव (जि. वाशिम): स्वयंपाक का केला नसल्याची विचारणा करायला गेलेल्या पतीला पत्नीने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार मालेगाव येथील संतोषी माता नगरात रविवारी उघडकीस आला. यामध्ये पतीचे डोके फुटले आहे. येथील संतोषी माता नगर येथे प्रशांत अर्जुन अढाव हे कुटुंबासह राहतात. २५ ऑ क्टोबर रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांना भूक लागल्याने ते घरी आले. यावेळी घरी स्वयंपाक झाला नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. खूप भूक लागली असून, तू स्वयंपाक का केला नाही, या मुद्यावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. राग अनावर झाल्याने पत्नीने चुलीजवळ असलेली लोखंडी सळी रागाने अढाव यांच्यावर फेकून मारली. सळी डोक्यावर लागल्याने डोक्याला मोठी जखम झाली. प्रशांत अढाव यांच्या तक्रारीहून पत्नीविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ पांडुरंग राठोड हे करीत आहेत.

Web Title: Blow the head of the husband!